Cleanup martial out Mumbai Appointment of 3000 workers municipality
Cleanup martial out Mumbai Appointment of 3000 workers municipality sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईतून क्लीनअप मार्शल आऊट; पालिका करणार ५ हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणारे, घाण करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र क्लीन अप मार्शलनी वसुलीचा धंदा सुरु केल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईतून क्लीन अप मार्शल कायमचे आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता क्लीन अप मार्शलच्या ऐवजी पाच हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती केली जाणार असून स्वच्छता दूत दंडात्मक कारवाई करणार नसून फक्त जनजागृती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये कोविड वॉरियर्सना पालिकेचे स्वच्छतादूत म्हणून सामावून घेण्यात येणार आहे.

रस्त्यांवर थुंकणारे, घाण करणारे, नाल्यात कचरा फेकणारे यांच्यावर नजर ठेवत दंडात्मक कारवाईसाठी क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले होते. मात्र काम कमी वसुली जादा म्हणून वसुली मार्शल अशी क्लीन अप मार्शलची ओळख निर्माण झाली होती.

क्लीन अप मार्शल पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे क्लीन अप मार्शल ऐवजी ५ हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतून क्लीन अप मार्शलऐवजी आता स्वच्छता दूत दिसणार आहेत.

दहा स्वच्छता दुतांमागे एक पर्यवेक्षक !

५ हजार स्वच्छतादूत नेमण्यासह प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नेमला जाणार आहे. हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, तर ते प्रामुख्याने महानगरातील त्यांना नेमून दिलेल्या भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन आदी बाबींवर देखरेख करणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी मदत करतील. स्वच्छतादूतांची कर्तव्ये, कामांच्या वेळा, मानधन आदींचा समावेश या धोरणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT