मुंबई

मुंबई पोलिसांच्या विशेष कार्य पथकाचा विशेष भत्त्याचा मार्ग मोकळा

अनिश पाटील

मुंबई:  मुंबई पोलिसांच्या विशेष कार्य पथकाला(एसओएस) कार्यरत पोलिसांचा प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत गँगस्टर आणि स्मगरांचे राज्य असताना 80 च्या दशकात स्थानक झालेल्या या पथकाची गेल्या वर्षी पुनर्बांधणी करण्यात आली होती. मात्र, सातव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड पे रद्द झाल्यामुळे तसेच कोरोना संकटनामुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग लालफीतीत अडकून पडला होता. राज्य सरकारने नुकताच याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता गुन्हे शाखेतील पोलिसांना मूळ वेतनाच्या 25 टक्के प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या विशेष पथकांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. सरकारी निर्णयानुसार आता विशेष कार्य पथकाला हा भत्ता मिळणार आहे.

गँगवॉरचा विमोड करण्यासाठी 80 च्या दशकात स्थापना, गेल्या वर्षी पुनरुज्जीवन
80 च्या दशकात गँगवॉरने उच्चांक गाठला असताना विशेष कार्य पथक(एसओएस) स्थापन करण्यात आले होते. करीम लाला, दाऊद इब्राहिम, हाजी मस्तान या सारखे गँगस्टर्सची मुंबईत दहशत होती. त्यांच्यासोबत दोन हात करण्यासाठी बुलेटप्रुफ जॅकेट आणि अद्ययावत शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असलेल्या पथकाची आवश्यकता होती.

सहपोलिस आयुक्त अरविंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गँगवॉर संपला पुढे मुंबई पोलिसांनी  मुंबई हल्ल्यानंतर फोर्स वन आणि त्यानंतर क्यूआरटीसारखी पथके स्थापन केल्यानंतर गेली 10 वर्ष या पथकाची घडी पूर्णपणे विस्कटली होती. गेल्या वर्षी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी या पथकाची पुनर्बांधणी केली. त्यांना नवा काळ्या रंगाचा गणवेश देण्यात आला होता. तसेच एमपी 4 एस, एसएलआर, एके47 सारखी अद्ययावत शस्त्रही पुरवण्यात आली. त्यांना क्यूआरटी आणि फोर्सवनच्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते. या पथकात सध्या 53 मंजुर पदांपैकी 32 पोलिस कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या 25 टक्के, तर चालकांना 15 टक्के प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Clear way special allowance of Mumbai Police Special Task Force

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT