Hemant-Nagrale on Bulli Bai case
Hemant-Nagrale on Bulli Bai case sakal media
मुंबई

क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी तीनजण अटकेत; मुंबई पोलिसांची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

क्लब हाऊस अॅपप्रकरणी (Club House) मुंबईच्या सायबर पोलिसांनी तीनजणांना ट्राझिस्ट रिमांडवर ताब्यात घेतलं आहे. आकाश, जेष्णव आणि यश पराशर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तरुणांना हरियानातून (Haryana) अटक केली आहे. यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. क्लब हाऊस अॅप चॅटमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद आणि क्रूर वक्तव्य केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करुन मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी बुली बाई अॅपनंतर (Bulli Bai App) या क्लब हाऊस अॅपद्वारे मुस्लिम महिलांची (Islam women) बदनामी केली जात होती. याप्रकरणी रझा अकादमीने मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मुस्लिम महिलांची सौदेबाजी करणारं बुली बाई अ‍ॅप हे काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. (Bulli Bai App) या अ‍ॅपवर कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केलं जात होतं. हे बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होतं. यानंतर लोकांना या मुस्लिम महिलांच्या लिलावासाठी प्रोत्साहित केलं जात होतं. दरम्यान, आता क्लब हाऊस अॅपप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT