CM eknath Shinde esakal
मुंबई

Eknath Shinde: किर्तीकरांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची नाराजी? शिवसेनेच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Eknath Shinde: एखाद्या व्यक्तीवर आरोप असेल तर चौकशी करणे योग्य नव्हे काय. असा प्रश्नही करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

CM eknath Shinde

मुंबई: ‘‘मोदीजी ४०० जागा नक्की जिंकतील पण ‘ईडी’ कारवायांचा त्यांनी वापर करू नये,’’ असे विधान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर नुकतेच केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहीर वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. ‘ईडी’ कारवाया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सुचनेनुसार चालतात, असे किर्तीकर यांच्या वक्तव्यावर सूचित होते आहे.

एखाद्या व्यक्तीवर आरोप असेल तर चौकशी करणे योग्य नव्हे काय. असा प्रश्नही करण्यात आला आहे. किर्तीकर शिवसेनेत असले तरी ते चार महिन्यांच्या विलंबाने ते आपल्याकडे आले. त्यांच्या विधानामुळे आता हेतूबद्दल शंका निर्माण व्हायला नको, अशी चर्चा शिवसेनेच्या बैठकीत झाली असल्याचे समजते.

‘किर्तीकर यांच्या जाहीर विधानांची दखल भाजपच्या श्रेष्ठींनी दखल घेतली आहे. सत्तारूढ पक्षातील खासदारानेच विरोधी वक्तव्ये केली तर विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडेल,’ हे लक्षात घ्या असे पक्षाला कळवण्यात आले आहे.

किर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा मुंबई भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किर्तीकर शरीराने शिंदे यांच्या पक्षात आले असले तरी ते मनाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.

खिचडी गैरव्यवहारात ९५ लाखांची रक्कम खात्यात जमा कशी झाली याची चौकशी सुरु आहे. कोणताही गैरव्यवहार झाला नाही असे कसे काय म्हटले जाते असा प्रश्नही भाजप नेत्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT