Worli Hit And Run Case Esakal
मुंबई

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'जरी तो कार्यकर्ता...'

CM Eknath Shinde On Worli Hit And Run Case: 'वरळी हिट अँड रन प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.', अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वरळी हिट अँड रन प्रकरणात अनेक अपडेट समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिहीर शहाच्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिहीर शहा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

'कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकारमध्ये देखील सर्व घटनांकडे आम्ही समान पाहतो आहोत. त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर मार्गाने होणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटना वारंवार होऊ नये यासाठी शासन आणि गृह विभाग उपायोजना करेल. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत', असंही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले आहे.

'विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काहीही काम नाही. या घटनेत कोण कोणाला पाठिशी घातलतंय असं समजण्याची गरज नाही. जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कोणी पाठीशी घालणार नाही. सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे', असंही त्यांनी म्हटलं आहे.

आता या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. शहा पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात घडला त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होते. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता अनेक खुलासे समोर येत आहेत. घटनाक्रमानुसार मिहीर शाह हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर याचे बील देखील आता समोर आले आहे.

मद्यप्राशन केल्यानंतर तो घरी गोरेगावला गेला. घरी गेल्या नंतर त्याने आपल्या ड्राइवरला लॉन्ग ड्राईव्हला जाण्यासाठी जायचं असल्याचं सांगितले. नंतर तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर शाह हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉल जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा मिहीर शहा हा मध्यप्रशन केलेला होता. चालक तरूण मुलगा होता. त्याला ताब्यात घेतले आहे. संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT