CM Eknath Shinde Inspected Thane Nashik Highway Mumbai Nashik road Potholes Inspection  
मुंबई

CM Shinde News : ठाणे-नाशिक महामार्गासाठी CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये! रस्त्याच्या पाहणी करत दिल्या महत्वाच्या सूचना

रोहित कणसे

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या चर्च्यांदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वःत त्या ठिकाणी जात परिस्थीतीचा पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे - नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली आणि रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. त्यावर उपाययोजना सुचवण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यामध्ये काही उपाययोजना सुचवण्यात आल्या. काही अनावश्यक क्रॉसिंगवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यावर पडलले खड्डे डांबराने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचे काम मुंबईकडून सुरू झालं आहे. तसेच पूर्ण रस्ता खड्डेमुक्त करण्यात येईल आणि त्यापसाठी काम सुरू झालं आहे. महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी शंभर ते दिडशे पोलिस आणि ट्रॉफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले.

ठाण्याकडून भिवंडीकडे जाताना मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना देखील दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रांजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देश दिले.

तसेच कोणते काम कुणाच्या अखत्यारित आहे याचा विचार न करता जनतेला होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिल्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT