eknath shinde_milind narvekar 
मुंबई

CM शिंदेंनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट; घरच्या बाप्पाचंही घेतलं दर्शन

नार्वेकरांच्या घरी उपस्थिती लावत त्यांनी घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीमुळं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात समोरासमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांचे राजकीय सल्लागार मिलिंद नार्वेकर यांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. निमित्त होतं नार्वेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन. यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली. (CM Eknath Shinde meets Milind Narvekar He also takes darshan of his home Ganesh Idol)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांसोबतचा फोटो ट्विट करुन या भेटीची माहिती दिली. राजकारण बाजूला पण गणोशोत्सवाच्या काळात विरोधकांच्याही घरी सदिच्छा भेटी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सिलसिला कायम आहे. दिवसभरात त्यांनी मुकेश अंबानी, राज ठाकरे यांच्या घरीही सदिच्छा भेट देत त्यांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेतले.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

54 वर्षीय मिलिंद नार्वेकर हे पूर्वी उद्धव ठाकरे यांचे खासगी स्वीय सहाय्यक होते. त्यांना सन २०१८ मध्ये शिवसेनेचं सचिव म्हणून घोषीत करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सन १९९४ पासून मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंशी संपर्क साधू इच्छिणाऱ्या शिवसैनिकांमधील प्रमुख दुवा होते. त्याचबरोबर ठाकरेंच्या विविध राजकीय यात्रांचं नियोजनही त्यांनीच केलं आहे.

राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात मिलिंद नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी नाराज शिंदे गटातील आमदारांच्या मनधरणीसाठी सूरतला पाठवलं होतं. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नार्वेकर आणि आमदार रवींदर फाटक हे गुजरातला रवाना झाले होते. त्यांनीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बातचीत घडवून आणल्याचंही सांगण्यात येत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT