Chief Minister Eknath Shinde Esakal
मुंबई

Eknath Shinde: बीचवर ट्रॅक्टर नेल्यावरुन आदित्य ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, तो...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या बीचवर सफाई मोहिमेत सहभाग नोंदवला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या बीचवर सफाई मोहिमेत सहभाग नोंदवला. त्यांनी स्वतः बीचवर ट्रॅक्टर चालवून त्याद्वारे कचरा साफ केला. त्यांच्या या ट्रॅक्टर चालवण्यावर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती.

ट्विट करत हा किती 'आऊट ऑफ दि बॉक्स' विचार आहे, अशा शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. (CM Eknath Shinde response to aditya thackeray criticism for taking tractor to beach)

ट्रॅक्टर कसला होता माहितीए का?

एकनाथ शिंदे म्हणाले, "ट्रॅक्टर कसला होता याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती, तो बीच कॉम्बर होता. म्हणजे समुद्राच्या बाजूला बीचवर जे दगड गोटे, कचरा, प्लॅस्टिक हे सगळं ते बीच कॉम्बरच्या जाळीत जमा होतो. यामध्ये या सर्व वस्तू ऑटोमॅटिक वेगळ्या केल्या जातात. यामुळं बीचवर फक्त चालण्यासाठी लोकांना वाळू राहते. खरं म्हणजे हे दुर्देव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती" (Latest Marathi News)

त्यांना काय कळणार?

ज्यांना मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोझर फिरवला त्यांना काय कळणार? मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, गावी गेलो शेती करायला आणि बीचवर सफाई करायला गेलो तरी सुद्ध यांना अडचण आहे. (Marathi Tajya Batmya)

तुम्हाला कसला मुख्यमंत्री पाहिजे?

खरंतर मी महाराष्ट्रातील जनतेलाच विचारतो की तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडं फिल्डवर काम करणारा आणि मुंबई डीपक्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे. खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फील्डवर उतरुन काम करतो. घरी बसून काम करत नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT