CM Eknath Shinde on Hit And Run Case esakal
मुंबई

CM Eknath Shinde: "मंत्र्यांची मुलं असो किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित..."; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं वक्तव्य

CM Eknath Shinde on Hit And Run Case: महाराष्ट्रातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी यात महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. यासंबधी त्यांनी सोशल मिडीया एक्सवरती त्यांनी यासंबधी पोस्ट शेअर केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या मोठ्या घटना समोर येताना दिसत आहेत. मुंबई, पुण्यासह, नागपूर यासह अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या प्रकरणात वाढ होत आहे. पुण्यानंतर आता नुकतीच मुंबईतील वरळी भागात एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा ही गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात करणारा मिहीर शाह याचे वडील शिवसेना पक्षाचे उपनेते असल्याने त्यांच्यासह टीका होत होती, या संपुर्ण प्रकरणावर आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबधीचं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये महत्त्वाचे निर्देश देखी दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरदार असो, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातलं जाणार नसल्याचंही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्थेत फेरफार करतात. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गैरफायदा सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कोणालाही न सोडता कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हिट अँड रनसारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय मिळाला यासाठी मी राज्य पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कोणीही असो त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरशहा किंवा मंत्र्यांची मुलं असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला पाठिशी घातलं जाणार नाही. माझे प्रशासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT