मुंबई

नरिमन पॉईंटला मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांनी घेतला 5.3 कोटींचा फ्लॅट

पूजा विचारे

मुंबईः राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतल्या नरिमन पॉईंट या भागात ५.३ कोटी रुपयांना एक नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अजोय मेहता हे मुख्य सल्लागार आहेत. १,०७६ चौरस मीटर कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट   मंत्रालयाजवळच्या जग्गनाथ भोसले मार्गावरील समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर आहे.

ऑक्टोबर महिन्यात या फ्लॅटसाठी व्यवहार करण्यात आले होते. या फ्लॅटसह त्यांना इमारतीत दोन कार पार्किंगचे स्लॉट मिळाले असल्याचंही समजतंय. दरम्यान त्यांनी हा फ्लॅट बाजारभावानं विकत घेतला आहे. दरम्यान या व्यवहाराची सर्व कागदपत्रं पब्लिक डोमेनमध्येही उपलब्ध आहेत. या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत ५ कोटी ३३ लाख रुपये आहे. मुंबई मिररनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, हा आलिशान फ्लॅट खरेदी करताना अजोय मेहता यांनी आरटीजीएसनं २ कोटी ७६ लाख रुपये दिलेत तर अडीज कोटी रुपये दिले. तीन लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम करापोटी कापण्यात आली. हा फ्लॅट विकणाऱ्या पुण्यातील अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने स्टॅम्प ड्युटीपोटी १०.६८ लाख रुपये भरले, अशी माहिती उपलब्ध कागदपत्रांनुसार समोर आली आहे. २००९ साली अनामित्रा प्रॉपर्टीजनं आशिष मनोहर यांच्याकडून चार कोटी रुपयांना हा फ्लॅट विकत घेतला होता.   २८ ऑगस्ट २०२० ला मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्याने १६.८० लाख रुपये ट्रान्सफर फी भरुन हा फ्लॅट ट्रान्सफर करायला परवानगी दिली. हा फ्लॅट विकणाऱ्या अनामित्रा प्रॉपर्टीजने ही रक्कम भरली. 

१९८४ बॅचचे अजोय मेहता हे आयएएस अधिकारी आहेत. २०१९ मे महिन्यात मेहता राज्याचे मुख्य सचिव बनले. त्याआधी ते चार वर्ष मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. ३० सप्टेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होणार होते. मात्र त्याच काळात राज्यात विधानसभा निवडणूक आल्यानं त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ३१ मार्च २०२०ला मुदतवाढीचा कालावधी संपला आणि त्यानंतर कोरोनाच्या संकट काळात त्यांना पुन्हा तीन महिने वाढवून दिले गेले. ३० जून २०२०ला निवृत्त झाल्यानंतर अजोय मेहता यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

-Cm uddhav thackeray chief advisor ajoy mehta purchase flat nariman point 5.33 cr

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT