मुंबई

शेतकरी राजा हे राज्याचे वैभव- मुख्यमंत्री ठाकरे

शेतकरी राजा हे राज्याचे वैभव- मुख्यमंत्री ठाकरे वाचा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे CM Uddhav Thackeray Guidance Speech to Maharashtra Farmers

विराज भागवत

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम गुरूवारी (१ जुलै) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मोहिमेंतर्गत ४० हजार गावांमधील ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. (CM Uddhav Thackeray Guidance Speech to Maharashtra Farmers)

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • आज कृषी दिन व डॉक्टर दिन आहे. दोघांचेही महत्व आपल्याला या कोविड काळात कळले आहे.

  • शेतकरी आणि डॉक्टर हे दोघेही अन्नदाते आणि जीवनदाते आहेत

  • शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत. दुष्काळ, पूर, गारपीट कोरोना अशा संकटांच्या वेळी शेतकरी डगमगला नाही.

  • शेतकरी राजा हे राज्याचे वैभव आहे

  • गेले काही काळ निसर्ग बदलतो आहे

  • सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.

  • महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कामकाजाची सुरुवात पीक कर्ज मुक्तीपासून केली. नंतर कोरोनाचे संकट आले पण शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले त्याचे उपकार विसरता येणार नाही.

  • आम्ही विकेल ते पिकेल ही योजना घेऊन आलो. जे पिकवीन ते विकल्या गेलेच पाहिजे असे ठरवले.

  • शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

  • आपल्या सरकारच्या टीमच्या कामाला दाद देत असताना लाखो शेतकऱ्यांचेही कौतुक आहे.

  • केंद्रात जे कायदे करायचे ते करू द्या पण शेतकऱ्याच्या हिताला धक्का पोहचेल ते राज्य शासन कधीही करणार नाही.

  • प्रयोगशील शेतीला नेहमी प्रोत्साहन देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT