मुंबई

#SakalImpact - धडपड्या संतोषच्या पाठीवर मुख्यमंत्र्याची कौतुकाची थाप..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या धडपड्या संतोष साबळे याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असा मोठा दिलासा दिला.

चौपाटीवर विकायचा चणे फुटाणे

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री दहा ते पहाटे पाच वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. त्याचे स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. साताऱ्यामधून मुंबईत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतोष साबळे याची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. संतोष खूप गरीब असून दिवसा तो कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरिन लाईन्स आणि गिरगाव चौपाटी येथे शेंगदाणे विकतो.

'सकाळ'च्या बातमीची दखल

अशा आशयाच्या 'सकाळ'च्या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संतोषशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आपला रात्रीचा नित्यक्रम संपवून विद्यापिठात जाणाऱ्या संतोषला मंत्रालयात येण्यासाठी संदेश देण्यात आला.मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतोषची चौकशी केली. त्याची माहिती घेतानाच शिक्षणाच्या धडपडीचे कौतुक केले.

तुला लागेल ती मदत केली जाईल

"शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर, त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल,"असा दिलासा दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या प्रकारे मदत करता येतील याची माहिती घेऊन, त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

भारावलेल्या संतोषने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दखल घेऊन आपली आस्थेने चौकशी केल्याबद्दल आभार मानले. यातून प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.

cm uddhav thackeray meets santosh after reading news in sakal newspaper :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT