मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्याआधी रस्ते चकाचक, स्वतः एकनाथ शिंदेनी रस्त्यावर उभं राहून करून घेतलं काम

सुमित बागुल

ठाणे : पावसाळा आणि मुंबई ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे म्हणजे काही नवीन समीकरण नाही. दरवर्षी पावसात मुंबई आणि ठाण्यात दमदार पाऊस पडतो. अशात तुफान ट्रॅफिकमुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो. यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे ठाण्यातील रस्त्यांवर गेल्या वर्षीच्या तुलनेत ट्राफिक कमी होता. कोरोनामुळे सर्व ठप्प असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माही ट्राफिक नव्हता असंही बोललं जातंय. मात्र तरीही ठाण्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळालं. 

यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी सर्वात आधी आवाज उठवला होता. गणेश उत्सवाच्या तोंडावर ठाण्यातील खड्डे बुजवले गेले नाहीत तर आम्ही खड्ड्यांसाठी आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा ठाणे मनपा आयुक्तांना काँग्रेसने दिलेला होता. 

त्यानंतर काही खड्डे बुजवलेही गेलेत. मात्र आता उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरून जाणार आहेत तिथले खड्डे आता गायब झालेत.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उभं राहून ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून घेतले आहेत. मात्र मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून प्रवास करणार आहेत केवळ त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतल्याचंही बोललं जातंय. यामध्ये MMRDA, MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देखील आहे.  

दरम्यान मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून जाणार नाही, त्या रस्त्यांवरील काही खड्डे अद्यापही तसेच आहेत. त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांसाठीच खड्डे बुजवले गेलेत का असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करतायत. 

before cm uddhav thackerays thane visit thane pothole problem solved by eknath shinde

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT