मुंबई

तिसऱ्या दिवशीही मुंबईत सीएनजीची घरघर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सीएनजीच्या पाईप लाईनमध्ये शुक्रवारी (ता.16) काही तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून, प्रवाशांचेही त्यामुळे हाल होत आहेत. 

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रक्रिया केंद्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (ता.16) सहा पंप बंद करण्यात आले होते. याचा परिणाम इतर 133 पंपांवरसुद्धा दिसून आला. संबंधित समस्या अद्यापही दूर न झाल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सीएनजीधारक वाहनांना सलग तिसऱ्या दिवशीदेखील त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजीचा पुरवठा कमी झाल्याने मागील तीन दिवस चालकांनी महागडे पेट्रोल टाकण्याऐवजी गाड्या बंद ठेवणे पसंत केले आहे.

दरम्यान, महानगर सीएनजी गॅस प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने, वाहतूकदारांचे हाल होत असून याबद्दल टॅक्‍सी व रिक्षाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील काही पंपांवर सीएनजीचा पुरवठा सुरळीत झाल्याने त्या पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. 

आपत्कालीन मदत कक्ष अनभिज्ञ 

ओएनजीसीकडून होणारा पुरवठा पूर्वपदावर कधी येणार? तसेच सीएनजी केंद्रात मिश्रित गॅसची समस्या कधी दूर होणार? याबाबतची कोणतीही माहिती महागनर गॅस लिमिटेडच्या आपत्कालीन मदत कक्षाला नव्हती. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडविरोधात सीएनजी पंपचालक व रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT