मुंबई

पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही तापच, गारवा कोरोनासाठी अत्यंत पोषक; संशोधकांचा दावा

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना विषाणूंसाठी थंड वातावरण पोषक आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळ्यातदेखील कोरोना वेगाने पसरण्याचा धोका असल्याचा इशारा आयआयटी भुवनेश्वर आणि दिल्लीतील एम्सच्या संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पावसाला सुरुवात झाल्यापासून तापमान घसरले असून गारव्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे अलीकडच्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पुढेदेखील कोरोनाग्रस्तांंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा निष्कर्ष आयआयटी भुवनेश्वरच्या स्कुल ऑफ अर्थ सोशल अँड क्लायमेट ऑफ सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक व्ही. मनोज यांच्या नेतृत्वात झालेल्या संशोधनातून काढण्यात आला. 

देशभरात कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर साधारणत: एप्रिल ते जून या कालावधीतील कोरोना विषाणूच्या प्रसाराचे स्वरूप आणि देशातील 28 राज्यांमध्ये सापडलेले रुग्ण या आधारावर हे संशोधन केले गेले. यासाठी वेगवेगळ्या परिसरातील वेगवेगळ्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. तापमानाच्या चढ उतारानुसार कोरोनाचा प्रभाव या काळात कमी अधिक झाल्याचे या संशोधनात आढळले.

तापमानानूसार रुग्णवाढ : 

वातावरणात उष्मा वाढला की कोरोना विषाणूंचा प्रभाव काहीसा कमी होतो. तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाली की, रुग्णसंख्येत 0.99 टक्के घसरण होते. त्याचप्रमाणे रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होतो असे, संशोधनातून समोर आल्याचे संशोधक प्राध्यापक व्ही. मनोज यांनी सांगितले. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता वाढल्यानंतरही हाच परिणाम जाणवतो, असेही दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

cold weather is very good for the growth of corona virus says researchers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT