मुंबई

म्हणून कॉलेज कॅम्पमध्ये पुन्हा कावकाव 

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : येथील कॉलेज कॅम्पस परिसरात कावळे मृत्यूमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेने महाविद्यालयाच्या प्राचार्या व्यथित झाल्या. त्यांनी निवासस्थान असलेल्या थेट अंबरनाथ येथून सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मदतीने उल्हासनगर गाठून अन्य कावळ्यांचह अन्न- पाण्याची सोय केली. त्यामुळे या परिसरात पुन्हा कावकाव सुरू झाली आहे. 

उल्हासनगरातील चांदीबाई कॉलेजचा परिसर हा वृक्षांनी वेढलेला आहे. त्याच्या आश्रयाला शेकडो कावळे आहेत. काहींनी घरटीही बांधली आहेत. लॉकडाऊनमध्ये हा परिसर बंद असल्याने निर्जन आहे. त्यामुळे उपासमारीमुळे कावळे जीव सोडू लागले. 


हे वाचा : पंतप्रधान उद्या देशाला संबोधित करणार 

ही माहिती मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी कॉलेजच्या प्राचार्य मंजू पाठक यांना सांगितली. परंतु त्या अंबरनाथ येथील नवरे नगरात रहात असल्याने त्यांना तातडीने कॉलेजपर्यंत पोहचणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्या व्यथित झाल्या. त्यातच उल्हासनगरकडे जाणाऱ्या सीमा बंद असल्याने कॉलेजपर्यंत पोहचणार कसे, असा प्रश्न पाठक यांना पडला होता. त्यांनी याबाबतची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांना सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या वाहनातून प्राचार्या पाठक यांना उल्हासनगरला पाठवले. पाठक यांच्यासोबत रजिस्टार अशोक रोहरा, पर्यावरण प्रेमी हरी चावला यांनी गहू, ज्वारी, बाजरी अशा दाणा-पाण्याची सोय केली. त्यामुळे कॉलेज परिसरात कावळ्यांची पुन्हा कावकाव सुरू झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT