Mumbai High Court Sakal media
मुंबई

कोविड मध्ये 'CET' घेवून राज्य सरकारला काय साध्य करायचंय ? - हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : विद्यार्थ्यांना मनासारखे महाविद्यालय (college) मिळण्यापेक्षा त्यांचा जगण्याचा अधिकार अबाधित राहणे (right to live) जास्त महत्त्वाचे आहे. कोरोना काळात अशी सीईटी (CET) घेऊन राज्य सरकार (Maharashtra government) काय साध्य करणार आहे, असे ताशेरे उच्च न्यायालयाने (Mumbai high court) निकाल पत्रात व्यक्त केले आहेत.

राज्य सरकारने कायद्यात कोणतीही तरतूद नसताना आणलेली सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या अधिकारात बाधा ठरत आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात अशी सीईटी आणून राज्य सरकार काय साध्य करणार आहे. अशी परीक्षा आयोजित करणे म्हणजे केवळ अन्य बोर्डच नव्हे तर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवरही अन्यायकारक आहे. अशाप्रकारे परीक्षा घेण्याच सबळ कारण कायदेशीररित्या राज्य सरकारने स्पष्ट केलेले नाही, प्रवेशासाठी परीक्षा घेण्याचा, तेही या संसर्गाच्या काळात, संबंध काय आहे हे स्पष्ट केला नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत.

परीक्षेत सामील होणार्यांना मनासारखे महाविद्यालय मिळेल हा उद्देश अन्य विद्यार्थ्यांसाठी कठोर आणि मनमानी आणि भेदभाव निर्माण करणारा आहे आणि राज्य घटनेच्या अनुच्छेद 14 नुसार समानतेच्या अधिकारांवर आक्रमण करणारा आहे, असेही न्यायालयाने सुनावले आहे. जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतात त्यांना अकरावीला प्रवेश मिळायला हवा. मग अन्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अटी घालून हा प्रवेश मिळता कामा नये, एस एस सी बोर्ड आणि अन्य विद्यार्थी यांच्या मध्ये भेदभाव होता कामा नये, त्यामुळे जरी याचिका दाखल झाली नसती तरी न्यायालयाने या मनमानी नोटीसीची स्युमोटो याचिकेद्वारे दखल घेतली असती, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या अधिकाराशी निगडित आहे.

अशावेळी न्यायालय मूक भूमिका घेऊ शकत नाही, असे खंडपीठाने 62 पानी निकालपत्रात स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष परीक्षा म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येणार, अद्याप त्यांचे लसीकरण झालेले नाही आणि त्यांना याचा धोका आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, मनासारखे महाविद्यालय मिळण्यापेक्षा जीवन जास्त महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे. अनन्या पत्की या विद्यार्थिनीसह चारजणांनी याचिकेत बाजू मांडायला अर्ज केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT