शेतकरी प्रफुल्ल पाटील 
मुंबई

आश्चर्यच..! कलिंगड, सिमला मिरची अगदी कलरफुल!

सकाळ वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत अत्याधुनिक शेती सुरू केली आहे. फळे, फुले, भाजीपाला अशी अनेक उत्पादने घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग आता शेतकरी करू लागले आहेत. असाच एक प्रयोग देवघर येथील युवा शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी केला आहे. त्यांनी आपल्या पाच एकर जागेत सिमला मिरची व रंगीबेरंगी कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. 

रंगीबेरंगी कलिंगडासाठी नोव्हा या कंपनीच्या अनमोल आणि विशाखा या वाणाच्या कलिंगडाची लागवड पाटील यांनी केली. बियाणे लागवडीपासून ९० दिवसांत हे पीक तयार झाले आहे. मल्चिंग आणि ठिंबक पद्धतीने ही शेती केल्याने मनुष्यबळ अगदी कमी झाले. अवघ्या एक-दोन माणसांमध्ये शेतीचे नियोजन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा ः आता जेवढा कराल 'कचरा' तेवढा भरावा लागेल 'टॅक्स'

पाटील यांनी पिवळ्या व हिरव्या अशा दोन रंगात कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. पिवळ्या कलिंगडातील आतील गर हा लाल आहे; तर हिरव्या कलिंगडातील आतील गर हा पिवळा आहे. तसेच काही कलिंगडे चौकोनी, बदामी अशा या आकारामध्येदेखील तयार केली आहेत. एक कलिंगड तीन ते चार किलोपर्यंत झाल्याचे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. एका किलोला १८ ते २० रुपये दर असल्याने एकरी ४ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा ः 'हे' खा आणि आयुष्यभर फिट राहा 

तसेच लाल, पिवळ्या व हिरव्या अशा तीन रंगात सिमला मिरचीचे पीक घेतले आहे. त्यासाठी रिझवान या वाणाचे बियाणे वापरले आहे. १० गुंठे जागेत ४ हजार झाडे लावली आहेत. इनसेट नेटमध्ये सिमला मिरचीची लागवड केली असल्याचे 
पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Mhada Lottery: मुंबईकरांची गृहस्वप्नपूर्ती! म्हाडाच्या २,६४० घरांची सोडत जाहीर; पुढील लॉटरी कधी?

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT