shivsena uddhav thackeray criticizes BJP for thackeray family dynasticism maharashtra politics  Sakal
मुंबई

"दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण..."; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

हायकोर्टनं शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की, "दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका" (Come to Dussehra gathering with enthusiasm Uddhav Thackeray appeal to Shiv Sainik)

उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे. आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या...वाजत गाजत या...गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका.

कारण इतर काय करतील त्याची आपल्याला कल्पना नाही. पण आपली परंपरा आहे की शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधीत्व करतो आहोत. या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाबरोबरच परदेशात राहणाऱ्या बांधवाचंही याकडे लक्ष लागलं होतं. त्यामुळं या मेळाव्याला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका.

दसरा मेळाव्याकडे देशाबरोबरच जगाचं लक्ष

कारण इतर काय करतील त्याची आपल्याला कल्पना नाही. पण आपली परंपरा आहे की शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधीत्व करतो आहोत. या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाबरोबरच परदेशात राहणाऱ्या बांधवाचंही याकडे लक्ष लागलं होतं. त्यामुळं या मेळाव्याला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारवर

आमची शिवसेना वाढलेली आहे, परवाचा आमचा मेळावा हा फक्त शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टानं राज्य सरकारवर टाकली आहे. त्यामुळं राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार असणार आहे आणि राज्य सरकार ही जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT