Mumbai Crime esakal
मुंबई

Mumbai Crime: हत्या केली आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण केल्याचा रचला बनाव; डोंबिवलीतील घटना

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन केली अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली: भर रस्त्यात त्याने एकाला चाकूने भोसकत हत्या केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर होत आपल्याला मारहाण झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी रुग्णालयात त्याला उपचारासाठी पाठविले.

तो जाताच पोलिसांना सदर व्यक्तीने हत्या केल्याची माहिती मिळाली. तोच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत आरोपीला अटक केल्याची फिल्मी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

अमोल लोखंडे असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी जयेश डोईफोडे याला अटक केली आहे.

कल्याण पूर्वेत रविवारी रात्री ही घटना घडली आहे. अमोल आणि जयेश यांच्यात पूर्वीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी अमोल याने जयेशच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असे विचारले. यामुळे जयेश चिडला होता.

याच गोष्टीचा राग मनात धरुन अमोलचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. अमोल रविवारी रात्री परिसरात उभा असताना जयेशने मागून येऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.

अमोलची हत्या केल्यानंतर जयेश हा स्वतः कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्याला मारहाण झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला मेमो देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं.

काही वेळाने पोलिसांना हत्येची माहिती मिळाली. जयेशनेच ही हत्या केल्याची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत जयेशला ताब्यात घेतले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येची घटना नोंद करण्यात आली असून पोलीस जयेशची अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

SCROLL FOR NEXT