मुंबई

कुणीही या, जेवण घेऊन जा; मुंबईत भुकेल्या माणसांना मोफत अन्न देणारे 'कम्युनिटी फ्रिज'

सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या खास दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये कम्युनिटी फ्रीज संकल्पना सुरू केली आहे. अन्नाची नासाडी होऊ नये आणि गरजू व्यक्तींना अन्न मिळावं असा यामागील उद्देश असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवशी या खास उपक्रमाचं उदघाटन करण्यात आलं. याबाबत स्वतः नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली आणि यामागील उद्देश स्पष्ट केला. याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणालेत की, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कम्युनिटी फ्रीज संकल्पना सुरू केली आहे. सध्या मुंबईत दोन ठिकाणी ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे.अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत अनेकजणांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. अशात ज्यांच्याकडे अधिकचं अन्न आहे त्यांनी ते नीट पॅक करून या फ्रिजमध्ये ठेऊन दयावे. ज्यांना या अन्नाची गरज आहे त्यांनी या फ्रिजमधून अन्न घेऊन जावं.   

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

या सोबतच मुंबईत गारवा जाणवायला सुरवात झाली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या साहाय्याने  मुंबईत 'माणुसकीची भिंत' ही संकल्पना देखील राबवण्यास सुरवात झाली आहे. या माध्यमातून गरजू व्यक्तींना  थंडीच्या दिवसांमध्ये उबदार कपड्यांची सोय होऊ शकते. ज्यांच्याकडे अतिरिक्त कपडे आहेत त्यांनी या माणुसकीच्या भिंतीवर कपडे टांगायचं असतात. ज्यांना या कपड्यांची गरज असते ते हे कपडे घेऊन जाऊ शकतात.  

community fridges installed in mumbi on the birthday of sharad pawar by nawab malik and NCP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT