मुंबई

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण...

तेजस वाघमारे


मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे.

दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले.

त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत.

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Factory Protest : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या साखर कारखान्यावर दगडफेक; मळी मिश्रित पाण्यावरून भेंडवडे ग्रामस्थांचा संताप अनावर

Year Ender 2025 : या सरकारी योजनांनी बदललं लाखो लोकांचं आयुष्य; जाणून घ्या या वर्षातील टॉप योजना

Year End Car : 2025 वर्षांत 'या' टॉप 10 कार ठरल्या बेस्ट; 31 डिसेंबरपर्यंत गाडी खरेदीवर चक्क 3 लाख पर्यंतचा डिस्काउंट

विराट कोहली, रोहित शर्मा Vijay Hazare Trophy त खेळून किती रुपये कमावणार? दोघांना इथेही लॉटरीच...

Solapur Crime : कपड्याला 'शी' लागली म्हणून प्रेयसीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा अकबरने निर्दयीपणे गळा दाबून केला खून

SCROLL FOR NEXT