मुंबई

गृहमंत्रालयाच्या वरदहस्ताखाली विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याची स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा


वसई : वर्णश्रेष्ठत्वाला उचलून धरणारी शिक्षणव्यवस्था हिटलरने विसाव्या शतकात राबवली होती. आज तोच आदर्श झाल्याचे दिसून येत आहे. काश्‍मीरमध्ये चार महिने शिक्षणव्यवस्था ठप्प झाली; मात्र त्याचं सोयरसुतक नाही. देशभरात विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकण्याची गृह मंत्रालयाच्या वरदहस्ताखाली यंत्रणेत स्पर्धा सुरू झालेली आहे. शिक्षणव्यवस्थेत दिवसेंदिवस विषमतेचं आकारमान वाढत आहे, अशी खंत विरार येथे संपन्न झालेल्या नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केली.

विरार येथील विवा महाविद्यालयाच्या सभागृहात नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी साहित्यिका प्रा. प्रज्ञा दया पवार, आमदार कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिका सिसिलिया कार्व्हालो, दिनेश कांबळे, स्नेहा जोशी, संजीव पाटील, अजीव पाटील, हार्दिक राऊत, कवी अरुण म्हात्रे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष जयवंत पाटील, सुभाष मोर आदी उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाल्या, की राष्ट्रद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी तयार केला. हा कायदा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, ॲनी बेझंट यांच्याविरोधात वापरला गेला. एकदा का धर्माचा अधर्मावरील विजय ही उक्ती शासकीय दस्तऐवजामध्ये आणि तीही शिक्षणविषयक नीतितत्त्वामध्ये जात असेल, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या धर्मद्रोही म्हणून हत्या घडवून आणणाऱ्या सनातन प्रभातचेच राज्य देशभरात आले असे मानायला हरकत नाही.

ही बातमी वाचा ः साड्या, पडदे, बेडशीट खरेदीवर कांदे फ्री फ्री फ्री...
ट्युशनमुक्त भारत करा
विद्यार्थ्याला माणूस व्हायला शिकवा, आज सर्व क्षेत्रांत बाजारीकरण झाले आहे. त्यामुळे शेवटचा विद्यार्थीदेखील पुढे कसा जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिक्षणाच्या पदराखाली शिक्षण घेतले जायचे. आज बालकं, पालक, शासन युती झाली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून ट्युशनमुक्त भारत झाला पाहिजे असे या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी विचार मांडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT