मुंबई

पोलिसांच्या अहवालात मोठं घबाड उघड; तक्रार केवळ पाच लाखांची, प्रत्यक्षात चोरी 27 लाखांची

अनिश पाटील

मुंबई, ता.06 : वरळी सीफेस येथे 77 वर्षीय महिलेच्या हत्येसह पाच लाखांची मालमत्ता चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती. पण आरोपीच्या अटकेनंतर प्रत्यक्षात त्याने 27 लाखांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वरळी सी फेस येथील प्रसन्न कुटीर या तीन मजली बंगल्यात  पती, मुलगा, सुन यांच्यासोबत विषणी डोलवानी राहत होत्या. 25 फेब्रुवारी रोजी विषणी या तळ मजल्यावर टीव्ही पाहत बसल्या होत्या. तर पहिल्या मजल्यावर त्याचा मुलगा झोपण्यासाठी गेला होता. बंगल्यातील सुरक्षारक्षकाने मध्यरात्री विषणी यांच्या मुलाला फोन केला. घरात कामाला असलेला नोकर अद्याप आलेला नसल्याचे त्याने सांगितले.

काहीतरी काळंबेर असल्याचा संशय आल्याने विषणी यांचा मुलगा खाली आला. आईचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवल्याचे त्याने पाहिले. याबाबत त्याने पोलिसांना कळविले.

वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विषणी यांना जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरातील पाच लाखांचे दागिनेही गायब होते, असे तक्रारीत म्हटले होते. यावेळी दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे कामाला लागलेला नोकर अमरजीत कमरराज निशाद हा बेपत्ता होता.

अखेर पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार अभिजीत रामपलट जोरीया याला अटक केली. त्यावेळी त्याने 27 लाखांचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील बहुसंख्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुटुंबित दुःखात असल्यामुळे त्यांना सेफमधील दागीने चोरल्याबाबत तपासणी केली नाही. पण आरोपींकडून 20 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

complaint of only five lakhs actually theft of 27 lakhs reality revealed after police investigation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT