मुंबई

कल्याण खाडीवरील समांतर पुलाचे काम मे 2019 पर्यंत पुर्ण

सुचिता करमरकर

कल्याण - कल्याण खाडीवरील समांतर पुलाचे काम मे 2019 पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले आहेत. शिवसेनेचे कल्याण शहर उपप्रमुख रवी पाटील यांना पाठवलेल्या एका पत्रात प्राधिकरणाने हे आश्वासन दिले आहे. या समांतर पुलाला झालेला विलंब महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिलेल्या नवीन निर्देशामुळे झाला असल्याचे कारण या पत्रात म्हटलं आहे. 

18 सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सहापदरी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली शहरांमध्ये होत असलेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे तसेच जुना पत्री पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर होत असलेल्या त्रासामुळे कल्याण खाडीवरील समांतर पुलाचा विषय चर्चेत आला. या विषयाचा पाठपुरावा विविध पातळीवरून करण्यात आला. सेनेचे शहर उपप्रमुख रवी पाटील यांनी या विषयात प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या पत्राला प्राधिकरणाने दिलेल्या उत्तरात हा पुल नव्या निर्देशाप्रमाणे 31 मे 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. या पुलाच्या कामाचा आदेश 11 मार्च 2016 रोजी दिला गेला होता. चोवीस महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने प्राथमिक सर्वेक्षण आणि संकल्पन पूर्ण केले. या तांत्रिक कामांना 11 जुलै 2016  रोजी मंजुरी  दिली गेली. पावसाळ्यानंतर तांत्रिक कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मात्र महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने नेव्हिगेशन स्पेनच्या लांबी तसेच उंचीत वाढ करण्याचे सुधारित निर्देश दिले. या निर्देशाप्रमाणे पुलाच्या मध्य बाजूकडील गाळ्याची रचना नव्याने करावी लागली. त्यामुळे या पुलाच्या आराखड्यात तांत्रिक बदल केले गेले. या बदलांना जून 2017 मध्ये प्राधिकरणाची मान्यता मिळाली. या मान्यतेनंतर कंत्राटदाराला नवीन निर्देशानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले.  आज या पुलाचे 20 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या सात महिन्यात म्हणजेच 31 मे 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा दावा प्राधिकरणाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT