mumbai  sakal
मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये काँक्रीट रस्त्यांचे जाळे

एक हजार ३४ कोटींचा खर्च होणार

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर (Mira Bhayander) शहरात गामी काळात एक हजार कोटी रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जाणार आहे; मात्र पालिकेची (Municipal) आर्थिक स्थिती नाजूक असल्याने विकासकांना 'टीडीआर'(TDR) (ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईट्स) (Transfer development rights) देऊन त्यांच्या माध्यमातून रस्तेबांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे.

शहरातील १५ रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रीटचे करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आणि ते पूर्ण केले. यासाठी पालिकेला एमएमआरडीएने १४० कोटी रुपयांचे कर्ज देखील मंजूर केले शक्य होणार नाही. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी पालिकेने कन्सल्टंट या सल्लागाराची नेमणूक केली होती. सल्लागाराने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार शहरातील एकंदर ६७. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १०३४.५३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

टीडीआर पद्धतीने रस्तेबांधणी हा सर्वोत्तम उपाय असला, तरी रस्ते बांधणीसाठी विकासक पुढे येत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या धोरणातील त्रुटी दूर केल्या तर विकासक रस्तेबांधणीसाठी आहे, परंतु या निधीमधून शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करणे पुढे येतील, अशी सूचना आमदार आणि नगरसेविका गीता जैन यांनी दिली.

..म्हणून टीडीआर पद्धत

1 निधी उभारणीसंदर्भात चार पर्याय महासभेला दिले होते. सरकारकडून अनुदान प्राप्त करून घेणे, टीडीआर देऊन विकासकांकडून रस्ते तयार करून घेणे, डीफर पद्धतीने रस्त्यांची कामे करवून घेणे आणि एमएमआरडीए किंवा सरकारी संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करून घेणे आदींचा यामध्ये समावेश होता.

पालिकेच्या डोक्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने तसेच डीफर 2 पाठलीतही इलियाला अयाचकड बोजा असल्याने असेच डी फीडीआर देऊन विकासकांच्या माध्यमातून काँक्रीट रस्तेबांधणीला महासभेने पहिली पसंती दिली आहे. या पर्यायातून शिल्लक राहणारे रस्ते मग सरकारी अनुदान किंवा डीफर पद्धतीने बांधण्यात यावेत, असा निर्णय महासभेने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT