मुंबई

धक्कादायक! 'टीबी'च्या रुग्णालयांना भेडसावतोय कोरोनाबाधितांचा धोका

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : क्षयरोगावर उपचार घेण्यासाठी दाखल होत असलेले रुग्ण कोरोना बाधित आढळत आहेत. अशा दोन बाधित रुग्णांवर सध्या शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही रुग्णांना क्षयरोगाची बाधा नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे: मात्र अशा रुग्णांमुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


या दोन्ही महिला रुग्णांना क्षयरोगाची लक्षणे दिसत असल्याचे सांगत सायन रुग्णालयाने क्षयरोग रुग्णालयात पाठवले. क्षयरोग रुग्णालय प्रशासनाने या दोनही रुग्णांची कोरोना चाचणी केली असता त्या पॉझिटिव्ह आल्या. यातील एक रुग्ण 21 वर्षीय असून तिला 15 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला क्षयरोग झाल्याचा इतिहास आहे. दुसरी रुग्ण 22 वर्षीय असून तिला ही क्षयरोगी म्हणून 27 एप्रिलला दाखल करण्यात आले; मात्र या दोघींनाही क्षयरोगाची बाधा नसल्याचे क्षयरोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललीतकुमार आनंदे यांनी सांगितले.  याशिवाय लीलावती रुग्णालयातूनही दोन रुग्णांना क्षयरोगाची लक्षणे असल्याचे सांगत क्षयरोग रुग्णालयात पाठवण्यात आले; मात्र त्यांनाही क्षयरोग नसल्याचे निदान झाले. उलट त्यांच्यामध्येही कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने त्यांना इतर रुग्णालयात क्वारंटाईसाठी पाठवण्यात आले आहे. 

इतर रुग्ण, वैद्यकिय कर्मचाऱ्यांना धोका
काही दिवसांपुर्वी क्षयरोगावर उपचार करण्यासाठी मुंब्रा येथून आलेला रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाचा काही दिवसांनी उपचारदारम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला; मात्र त्या बाधित रुग्णामुळे क्षयरोग रूग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करावे लागले होते. क्षयरुग्ण म्हणून दाखल झालेले वारंवार कोरोनाबाधित आढळत असल्याने क्षयरोग रुग्णालयात दाखल असलेल्या 370 रुग्ण तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.


क्षयरोगी म्हणून इतर रुग्णालयातून आलेले रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. आता आम्ही अशा रुग्णांवरही उपचार सुरू केले आहेत. त्यांचा संसर्ग इतर रुग्णांना किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे.
- डॉ. ललीतकुमार आनंदे,  अधिष्ठाता, क्षयरोग रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे रुळांखालील खडी गेली वाहून, कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प

धक्कादायक! श्रीलंकेतील क्रिकेटपटूचा Live Match मध्ये मृत्यू, फलंदाजी करताना खेळपट्टीवर कोसळला अन्.. Video Viral

Latest Marathi News Live Update : ताम्हिणीत चोवीस तासांत ५८० मि.मी. पावसाची नोंद; मुळशी धरणात २४ तासांत २.९५ टीएमसी पाण्याची आवक

Satara Landslide: केळघर घाटात दरड कोसळली! मोठे झाड रस्त्यावर पडल्याने मेढा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प, पीडब्ल्यूडी व पोलिस दाखल

Yeola Politics : शिवसेनेचे सात नगरसेवक भुजबळांच्या गोटात! येवल्यातही राजकीय भूकंप, समीर भुजबळांच्या उपस्थितीत प्रथमच महायुती एकत्र

SCROLL FOR NEXT