मुंबई

इंटरनेट वापरताना 63 टक्के चिंतातुर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - "मायक्रोसॉफ्ट'ने डिजिटल सभ्यतेच्या निर्देशांकाच्या निमित्ताने नुकतेच 14 देशांत सर्वेक्षण केले. "सुरक्षित इंटरनेट दिना'च्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष काढण्यात आले. भारतातील सर्वेक्षणात 63 टक्के लोकांना ऑनलाईनमध्ये धोका असल्याचे वाटते, असे दिसून आले.

44 टक्के भारतीयांना काही महिन्यांत ऑनलाईन जोखमीला सामोरे जावे लागले. तरुण-तरुणी अधिक हुशारीने इंटरनेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. एखाद्या घटनेनंतर इंटरनेटवरून मदत कशी व कुठे मिळवायची, हे 50 टक्के तरुणांना माहीत आहे. प्रौढांमध्ये हे प्रमाण 35 टक्के आहे. इंटरनेट वापरताना फसवणुकीचा धोका वाटणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 64 टक्के आणि स्त्रियांचे प्रमाण 61 टक्के आहे. महिलांकडून अधिक प्रभावीपणे प्रायव्हसी कंट्रोलचा पर्याय वापरला जातो. इंटरनेट वापरणाऱ्यांची वागणूक आणि संभाषणाचा अभ्यास करणे हा ऑनलाईन सर्वेक्षणाचा उद्देश होता. सर्वेक्षणात 13 ते 17 वयोगटातील मुले आणि 18 ते 74 वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT