pune sakal
मुंबई

....अन महापौरांच्या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळ

राणेंविरोधात घोषणा सुरु असताना, अचानक महापौर म्हस्के यांनी दिलेल्या घोषणेने शिवसैनिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून राणे यांच्यावर टीका करण्यात आली. तर, राज्यभर शिवसैनिकांनी आंदोलने करत राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. तर, ठाण्यातील मनोरुग्णालयात चक्क त्यांच्या नावाचा केसपेपर देखील काढण्यात आले. तसेच दुसरीकडे ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात महापौरांसह अनेक शिवसैनिकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. यावेळी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु असतांना, अचानक ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेल्या घोषणेने मात्र, शिवसैनिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यावेळी महापौरांकडून नारायण राणे अंगार है अशी उलटी घोषणाबाजी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या आंदोलनाचा धसका घेऊन खोडसाळपणे हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचा खुलासा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. (Mumbai News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर पसरल्याचे दिसून आले. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून राणे यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत असून घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल देखील करण्यात आले आहे. त्याचे पडसाद ठाण्यात देखील उमटल्याचे दिसून आले. महापौर नरेश म्हस्के यांच्यसह शिवसेनेचे पदाधिकारी नौपाडा पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. यावेळी नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाल्यानंतर राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नारायण राणे चोर है, नारायण राणे भंगार है अशी घोषणाबाजी सुरु असताना महापौर नरेश म्हस्के यांनी उलटीच घोषणाबाजी केली. यावेळी महापौरांनी नारायण राणे अंगार है अशी घोषणाबाजी दिल्याने शिवसैनिक मात्र गोंधळले. आंदोलनच्या काही काळानंतर महापौरांचा या घोषणाबाजीचा व्हिडिओ आता सर्वत्र सामाजमाध्यामांवर वायरल झाला आहे. तर, विरोधकांकडून देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. मात्र, वायरल झालेल्या व्हिडिओमुळे ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

आज जे आंदोलन झाले, त्या आंदोलनाचा धसका घेवून सदरचा व्हिडीओ हा खोडसाळपणे तयार करुन व्हायरल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तरी सदर व्हिडीओची दखल घेवू नये.

- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT