Bhagat-singh-Koshyari-Cm-Thackeray 
मुंबई

मुख्यमंत्री-राज्यपालांच्या बैठकीबाबत गोंधळ; समन्वयाचा अभाव?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेच्या बारा जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे मंत्री आज राज्यपालांची भेट घेणार अशी चर्चा आज शिवसेनेच्या गोटातून सुरू झाली होती. पण या भेटीबाबत दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना माहितीच नसल्याचं आता समोर आलंय. त्याचबरोबर सरकारकडून भेटीसाठी वेळच मागितली नसल्याचं राजभवनातून सांगण्यात आलं. त्यामुळं या भेटीबाबत समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी मंत्र्यांच्या बैठकीबाबत राजभवनावर विचारले असता अशी वेळच मागितली नसल्याचे राजभवनावरून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे खरंच अशी बैठक आहे का? हा प्रश्न निर्माण झाला होता. तिन्ही पक्षांमध्ये राज्यपालांसोबतच्या बैठकीबाबत समन्वय नसल्यानं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अखेर मिलिंद नार्वेकर राजभवनावर राज्यपलांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचल्याचं सूत्रांकडून कळतंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, पण महाविकास आघाडीतील काही नेते राज्यपालांची संध्याकाळी ६.३० वाजताची वेळ मिळाल्याचे सांगत होते. तर दुसरीकडे अशी कोणतीही वेळ मागितली नसल्याचं राजभवनवरून सांगितलं जात होतं.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनवर एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रम सुरू असताना आणि कॅबिनेट बैठक संपल्यावर थोड्या वेळातच ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्यपालांबरोबर सरकारी नेत्यांची बैठक झाली नाही पण या बैठकीची चर्चा मात्र झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT