bala-thora .jpg 
मुंबई

लॉकडाउनबद्दल काँग्रेसची भूमिका काय? बाळासाहेब थोरात म्हणाले...

दीनानाथ परब

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही सोबत होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एच.के.पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पत्रकारांनी यावेळी राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महामंडळ वाटपाबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, "काही विषय एकत्र सोडवावे लागतील. राज्यमंत्र्यांचे अधिकार, निधी आणि महामंडळ यावर चर्चा झाल्याचे सांगितले." 

"किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. कोरोनाचे त्यानंतर नैसर्गिक संकटामध्ये मागचं वर्ष गेलं. निधीच्या समस्या आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. एकत्र सरकारमध्ये काही तक्रारी, मागण्या असतात, त्यातून  मार्ग निघू शकतो. कर्जमाफीचा विषय सोडवला अजून त्यात काही बाबी बाकी आहेत. हा किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे" असे थोरात म्हणाले.  

लॉकडाउन संदर्भातही थोराना यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. लॉकडाउनला काँग्रेसचा पाठिंबा आहे? या प्रश्नावर थोरात म्हणाले की, "लॉकडाउन नको असं आम्हा सर्वांना वाटतं. पण पर्याय काय? याबद्दल सगळ्यांशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील. लॉकडाइउन करायचा नाही,पण पुढं जायचं कसं ? याबद्दल चर्चा सुरु आहे" असे थोरात म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adult Content Addiction : अडल्ट कंटेंट पाहणे दारु अन् सिगारेटच्या व्यसनापेक्षाही घातक; डॉक्टरांनी तरुणाईला दिला धोक्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

IPL ची व्हॅल्यू कमी झाली! ऑनलाईन गेमिंगवरील बंदीचा फटका

Trump On Modi : रशियाच्या तेलावरून पुन्हा ‘ट्रम्प बाँब’, खरेदी थांबविण्याचे पंतप्रधान मोदींकडून आश्वासन मिळाल्याचा दावा

Solapur Fraud: 'मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले'; पोकलेन मशिन खरेदीतून भागीदारी व्यवसायाचे आमिष

SCROLL FOR NEXT