मुंबई

अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक, कथित चॅटविरोधात आंदोलन

पूजा विचारे

मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन मैदानात उतरली आहे. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा घेऊन गेले होते.  दरम्यान काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. कमला मिलबाहेर पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा अडवला.  यावेळी रिपब्लिक कार्यालयाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवतण्यात आला होता.

यावेळी आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णबविरोधात घोषणाबाजी करत, तात्काळ अटक करण्याची देखील मागणी केली.  रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता या दोघांच्या व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहे. विशेषतः बालाकोट सर्जिकल स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? असा सवाल काँग्रेसकडून विचारला जात आहे. यावर भाजप गप्प का? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील अर्णबच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. 

अर्णब गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन

गली गली मे शोर है अर्णव गोस्वामी चोर है... अटक करा अटक करा अर्णब गोस्वामी याला अटक करा... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी  जोरदार आंदोलन केले. 

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णब गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव जाहीर करावे यासाठी त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

Congress protests against Arnab Goswami chat leaks mumbai news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT