मुंबई

कोरोनामुळे रद्द झालेल्या सहलींचा परतावा न मिळाल्याने ग्राहक पंचायत जागतिक स्तरावर मागणार दाद

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः कोरोनाच्या फैलावामुळे विमानसेवा व टूर पॅकेज रद्द होऊनही पर्यटकांना त्याचे पैसे परत न मिळाल्यासंदर्भात जागतिक स्तरावर दाद मागण्याचा निर्णय मुंबई ग्राहक पंचायतीने घेतला आहे. ही रक्कम 35 अब्ज डॉलर एवढी असू शकते. 

विमानप्रवास व टूर पॅकेज रद्द झाली तरीही केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात अजूनही पर्यटकांना पैसे परत मिळाले नाहीत. वेगवेगळ्या देशांची परिस्थिती वेगळी आहे, विमानसेवा वेगळ्या आहेत, तरीही प्रवासी नाडले गेले आहेत आणि विमान कंपन्यांना मोठा तोटा झाला आहे हे त्यातील सामायिक मुद्दे आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाने वेगवेगळे नियम व तत्वे करण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रसंघ स्तरावर याप्रश्नी विचार करून सामायिक निर्णय घ्यावा, असे मत तयार होत आहे. 

सध्याच्या परिस्थितीमुळे विमान कंपन्या तोट्यात आल्या आहेत, त्यांनीही कामगार कपात-वेतन कपात असे मार्ग अवलंबले आहेत. काही देशांमध्ये तीन - सहा महिने ते वर्षभराने प्रवाशांचे पैसे परत देऊ असे सांगण्यात येत आहे. मात्र प्रवासीदेखील किती वेळ थांबणार हा प्रश्न आहे. या स्थितीत व्यवहार्य तोडगा काढणे आवश्यक आहे, त्यामुळे याप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघानेच मध्यस्थी करणे आवश्यक असल्याचे जगातील ग्राहक संघांचे मत बनत चालले आहे. फ्रान्समधील ग्राहक संघाने तेथील विमान कंपन्यांविरुद्ध खटले भरले आहेत. मुंबई ग्राहक पंचायत मात्र सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर मार्ग वापरू नये या मताची आहे. थोडे इकडेतिकडे झाले तरी चालेल, मात्र चर्चेतून सर्वांना स्वीकारार्ह ठरेल असा उपाय योजायला हवा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सकाळ ला सांगितले. 

जगातील सर्वच ग्राहक संघटनांची शिखर संस्था असलेली कंझ्युमर्स इंटरनॅशनल व त्यांचे सदस्य तसेच अमेरिका, फ्रान्स, ब्राझील, मलेशिया आदी सर्वजण या प्रस्तावावर विचार करीत आहेत. आपण स्वतः या सर्वच देशांमधील प्रवाशांची किती रक्कम बुडाली याचा तपशील घेत आहोत. ही रक्कम अडीच लाख कोटी रुपयांच्या घरात असावी, असाही अंदाज असल्याचे देशपांडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT