...म्हणून परदेशी कांद्याला ग्राहक, व्यापारी म्हणतायेत नको! 
मुंबई

...म्हणून परदेशी कांद्याला ग्राहक, व्यापारी म्हणतायेत नको!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत होणारी परदेशी कांद्याची आयात बंद झाली आहे. काही दिवसांपूर्वी इजिप्तवरून कांद्याची आवक सुरू झाली होती. हा कांदा तुर्की कांदा म्हणून ओळखला जातो. हा कांदा आकाराने मोठा असला तरी उग्र वास व तिखटपणा यामुळे या मालाला ग्राहकांची पसंती मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परदेशी कांद्याची आयात थांबवण्यात आली आहे. 

गेल्या दोन-तीन महिन्यापासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारकडून परदेशी कांद्याची आयात करण्यात आली. मात्र, हा कांदा आकाराने मोठा असून, सफेद व लाल या दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या उग्र वास व जास्त तिखटपणामुळे गृहिणीबरोबरच हॉटेल चालकांनी देखील या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. स्वयंपाक बनवताना या कांद्यासाठी तेलही जास्त लागत असल्याची तक्रार गृहिणींकडून केली जात आहे. सध्या बाजारात हा परदेशी लाल कांद्याची 5 कंटेनर तर सफेद कांद्याची 2 कंटेनर आवक होत होती. घाऊक दरात लाल कांदा 29 रुपये किलो तर सफेद कांदा 21 रुपये किलो दरात उपलब्ध आहे. तर किरकोळ बाजारात हा इजिप्त लाल कांदा 50 रुपये दरात उपलब्ध आहे. हॉटेल मालकही एकदा या मालाची खरेदी केल्यावर पुन्हा त्या कांद्याकडे पाठ फिरवत आहे असे, मनोहर तोतलानीया या कांदा व्यापाऱ्याने सांगितले. या परदेशी मालाला उठाव नसल्याने, त्याची आयात बंद करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले. 

सध्या देशातील कांद्याला चांगली मागणी आहे. तुलनात्मक विचार केला राज्यातील पुणे, नगर, सातारा येथील कांद्याला ग्राहकांची मागणी अधिक आहे. 
- अशोक वाळुंज, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT