मुंबई

सुसाट वाहनांवर नियंत्रणाची गरज, कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करणार

प्रशांत कांबळे

मुंबई: वेग मर्यादा न पाळल्यास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येत्या काही काळात राज्यभरात अशा वाहनांवर सुद्धा कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. नुकतेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर राज्यभरात कारवाईची मोहीम यशस्वी केल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

खासगी बस वाहतुकदारांकडून वाहतुकीचे आणि मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून सर्रास प्रवासी वाहतूक केली जाते. यासंदर्भात परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारीला परिवहन आयुक्तांनी 12 तासाची विशेष कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यावरून 6 फेब्रुवारी सकाळ 6 वाजेपर्यंत 3062 वाहनांची राज्यभरात तपासणी करून, नियम आणि बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 213 वाहनांची जप्ती करण्यात आली होती.

मात्र, याशिवाय अनेक प्रकारचे दंड खासगी वाहनचालक, अवजड वाहन, टॅक्सी, रिक्षा यांच्याकडून केल्या जाते. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर लेन कटिंगची सर्वात मोठी समस्या आहे. शिवाय इलेक्ट्रिक बाईकला परवानगी नसतानाही मुंबईच्या रस्त्यांवर नागरिकांकडून वापरल्या जात आहे. त्यामुळे अशा अनेक समस्यांवर अनपेक्षितपणे ठराविक वेळी राज्यभरात कारवाई मोहीम उभारल्या जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. त्यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसह शहरांमध्ये बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर मात्र, लवकरच आरटीओ विभागाकडून कारवाई मोहीम राबविल्या जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Control over vehicles Action will taken against break the law

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT