coolie movie sakal media
मुंबई

मुंबई : नवनवीन योजनांमुळे हमालांच्या पोटावर पाय

बॅटरी गाडी, बॅग ऑन व्हील, बेस्ट ट्रॅव्हल ट्रॉलीमुळे हमालांना रोजगार मिळेना

कुलदीप घायवट

मुंबई : ‘हमाल दे धमाल’, ‘कुली’, कुली नंबर 1 (coolie movie) यासारख्या चित्रपटांतून सामान्य हमालाचे जीवन (coolie movie) दाखविण्यात आले. हमालांना या चित्रपटातून नायकाचा दर्जा दिला. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे स्थानकातील (railway station) हमालांना बेरोजगारींने (unemployment) ग्रासले आहे. रेल्वेमध्ये येणाऱ्या नवनवीन योजनेमुळे (new scheme) हमालांच्या पोटावर पाय आला आहे. परिणामी, आता रेल्वे स्थानकातून हमाल वर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

अंगात लाल शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी असा पेहराव असलेला हमालांचे आयुष्य पूर्णतः धूसर झाले आहे. एकेकाळी डोक्यावर दोन बॅगा, दोन्ही खांद्यांना दोन आणि हातात दोन बॅगा घेऊन रिक्षा, टॅक्सीच्या दिशेने किंवा स्थानकात एक्स्प्रेसच्या दिशेने हमालांची धाव असायची. मात्र, हळुहळू काळ बदलत गेला. रेल्वे स्थानकात लिफ्ट, सरकते जिने उभारण्यात आले. रेल्वेने बॅग ऑन व्हील, बॅटरीची गाडी, बेस्ट ट्रॅव्हल ट्रॉली आणून हमालाच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, अशी व्यथा हमालांनी मांडली.

रेल्वेचा सर्वात जुना आणि विश्वासू मित्र हमाल आहे. मात्र सध्या हमालांची दिवसेंदिवस परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. सरकते जिने, लिफ्ट, सब-वे यामुळे हमालांना आता काही काम उरलेच नाही. कोरोना काळापासून हमाल आर्थिककोंडीत अडकला आहे. परिणामी, आता रेल्वेने हमलांना ग्रुप डी मध्ये समाविष्ट केले पाहिजे. त्यानंतर कंत्राटी पध्दत आणावी, अशी मागणी अण्णासाहेब साहेब पाटील माथाडी कामगार युनियन आणि ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनकडून सांगण्यात आले.

"रेल्वेकडून नवनवीन योजना आणून हमालाच्या पोटावर पाय मारण्याचे काम सुरू आहे. आता एलटीटीवर विमानतळासारखी खासगी तत्त्वावर ट्राॅली सुविधा आणल्याने प्रवासी वर्ग त्याकडे वळेल. तर, आता भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. 70 स्थानके खासगी तत्त्वावर चालविण्यात येतील. त्यामुळे हमाल आता हद्दपार होणार आहे."

- उद्धव शेळके, हमाल, एलटीटी

"घर खर्च, आरोग्य खर्च सांभाळणे कठिण होऊन बसले आहे. दररोजचा दिवस हातात काहीच पैसे येत नाही. स्थानकात बसून दिवस जातात. लांब पल्ल्यांच्या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती बिकट झाली आहे. हमालांना भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे."

- संतोष तळेकर, हमाल, ठाणे

"भारतीय रेल्वेमध्ये हमालांना खूप महत्त्व होते. मात्र, विदेशी परंपरा, विदेशांचे अनुकरण करण्यासाठी हमालांना रेल्वे स्थानकातून नामशेष केले जात आहे. विदेशात ज्याप्रमाणे हमाल नाही, तीच परिस्थिती भारतात लागू करण्यात येत आहे. सध्या मुंबई सेंट्रलवर शून्य टक्के ही काम नाही. भारतीय रेल्वेकडे, रेल्वे मंत्र्यांकडे  अनेक वर्षांपासून हमालांच्या मागण्या निर्दशास आणून मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली जात आहे. मात्र, गरिबांना वाली नसल्याने कोणताच सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळाला नाही."

- अंकुश घुगे, हमाल, मुंबई सेंट्रल

"विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येत आहे. मात्र, यामध्ये हमाल वर्गाचे मरण होणार आहे. हमालांनी दैनंदिन, मासिक घरगुती खर्च कसा करायचा, उदरनिर्वाह कसा करायचे असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे रेल्वेमधील ठेकेदारी पद्धत बंद केली पाहिजे. तर, 2008 च्या जी.आर.नुसार हमालांना रेल्वेत सामावून घ्यावे. ही मागणी रेल्वे मंत्री, रेल्वे मंत्रालयाने पूर्ण करावी."

-  अशोक आव्हाड, सीएसएमटी

सध्या मुंबई विभागात सुमारे 2 हजारांच्या संख्येने हमालांची संख्या आहे. यामध्ये सध्या एलटीटीला 61 हमाल, मुंबई सेंट्रलला 152 हमाल, सीएसएमटी येथे 92 हमाल आहेत. ठाणे, कल्याण, वांद्रे येथे देखील कार्यरत आहेत. 160 किलो वजनी बॅगा ट्रॉलीच्या साहाय्याने नेण्यासाठी 105 रुपये तर, 50 ते 60 किलो वजनी बॅगा डोक्यावरून नेण्यासाठी 50 ते 60 रुपये दर आहे. सध्याचा हा दर 25 वर्षांनी वाढला असून ट्रॉलीसाठी 80 रुपये घेतले जात होते. मात्र, काही स्थानकावर प्रवासी देतील, त्याप्रमाणे पैसे घेतले जात आहेत, असे हमालांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT