कोथिंबिरीची आवक निम्म्याने घटली
कोथिंबिरीची आवक निम्म्याने घटली 
मुंबई

कोथिंबिरीची आवक निम्म्याने घटली

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पावसाच्या संततधारेमुळे कोथिंबिरीची आवक ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. पावसामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाशीच्या एपीएमसी बाजारात आलेली कोथिंबीरही पाणी लागून सडल्याने किरकोळ बाजारातही कोथिंबीर दिसेनासी झाली आहे.

वाशीतील एपीएमसीमध्ये पुणे, नाशिक, लातूरहून मोठ्या प्रमाणावर कोथिंबीरची आवक होते. लातूरहून छोट्या जुड्या येतात; तर पुणे, नाशिकहून कोथिंबिरीच्या मोठ्या जुड्या येतात. एपीएमसीत रोज नाशिक, पुणे येथून ६० हून अधिक गाड्या दाखल होतात. गेल्या महिन्याच्या तुलनेत मागील काही दिवसांत कोथिंबीर घेऊन येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाल्याचे कोथिंबिरीचे घाऊक विक्रेते अनंत प्रभाळे यांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम असल्याने किरकोळ विक्रेतेही कोथिंबीर विक्रीसाठी ठेवत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे कोथिंबिरीची छोटी जुडी २० ते २५ रुपयांना, तर मोठी जुडी ५० ते ६० रुपयांना विकली जात आहे. याबाबत किरकोळ विक्रेत्या विमल पाटील यांनी सांगितले की, घाऊक बाजारात कोथिंबीरची आवक कमी आहे. पावसामुळे कोथिंबीर लवकर खराब होत आहे. थोडे जरी पाणी लागले तरी सडून जात असल्याने कोथिंबीर शक्‍यतो जास्त आणायचे टाळते. 

घाऊक बाजारात लातूरहून येणारी छोटी जुडी १२ ते १५ रुपये, तर नाशिकची मोठी जुडी ३० ते ४० रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पंधरवड्यात आवक ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. गाड्यांची संख्या पहायला गेल्यास आवक जास्त दिसते. परंतु, पावसामुळे आतला जवळपास ६० ते ७० टक्के माल खराब निघतो. त्याला बाजारात पाच रुपयेही किंमत मिळत नाही. 
- अनंत प्रभाळे, घाऊक विक्रेते, एपीएमसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT