brest milk bank  Source : Livemint.com
मुंबई

कोरोनाचा आशियातील पहिल्या ह्युमन मिल्क बँकला फटका

मातेचे दूध बाळासाठी लस, दूध दान करण्यासंबंधी जनजागृतीची वाढती गरज

भाग्यश्री भुवड

मुंबई : आईचे दूध हे जीवामृत असते, असे कितीही म्हटले तरी प्रत्येक नवजात बाळ (infant) किंवा मातेला (mother) ही नैसर्गिक देणगी मिळतेच असे नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे नवजात शिशु काचेच्या पेटीत असताना या बालकांसाठी मातेचे दूध हे वरदान ठरते. परंतु, या प्रक्रियेला कोरोनाचा (corona) मोठा फटका बसल्याचे जागतिक स्तनपान (breast feed) सप्ताहानिमित्त समोर आले आहे. 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पुन्हा एकदा दूध दानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल (एलटीएमजी) सायन  रुग्णालयातील  ह्युमन मिल्क बँकेमध्ये कोविड -19 महामारी सुरू झाल्यापासून दूध दानाच्या प्रमाणात 32 टक्के आणि दान करणाऱ्यांच्या संख्येत 46 टक्के घट दिसून आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, दान करणाऱ्यांची संख्या गेल्या चार वर्षांपासून कमी झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना दात्यांकडून दररोज दोन ते तीन कॉल येतात आणि गरजू नवजात मुलांसाठी दुधाचा पुरेसा साठाही उपलब्ध होत आहे.

32 वर्षांपूर्वी पालिकेच्या सायन रुग्णालयात आशियातील पहिली 'ह्युमन मिल्क बँक' सुरू झाली. या तीन दशकात यामुळे अनेक दुधाळ मातांनाच नवे जीवन मिळाले असे नाही, तर लोकांमध्ये वाढत्या जागरूकतेमुळे महानगरात ह्युमन मिल्क बँकांची संख्याही वाढली. पण, कोरोनाच्या काळात दुध दानातही परिणाम झाला आहे.

कोरोनामुळे दुध दानात जवळपास 50 टक्के घट झाली आहे, असे असूनही येथील कर्मचाऱ्यांनी गरजू निरागस मुलांना दुधाची कमतरता पडू दिली नाही.

रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 7,700 मातांनी दूध दान केले होते. 2019 मध्ये 7,300, त्यानंतर 2020 मध्ये 6,600 मातांनी दूध दान केले. मात्र, कोरोना काळात मोठ्या संख्येने घट होऊन फक्त 3,500 मातांनी दूध दान केले आहे. 2018 च्या तुलनेत 1,000 लिटर दान केले गेले, जे 2020 मध्ये फक्त 526 लिटरवर पोहोचले. तर, गेल्या सहा महिन्यांत फक्त 325 लिटर दूध दान झाले.

निओनाटोलॉजी आणि ह्युमन मिल्क बँकेच्या प्रमुख डॉ. स्वाती मणेरकर यांच्या मते, जन्मानंतर लगेचच बाळाला आईचे पिवळे घट्ट दूध पाजणे फार महत्वाचे असते. मातेचे दूध हे एका लसीसारखे काम करते. बाळाच्या वाढीसाठी लागणारे सर्व पौष्टीक घटक मातेच्या दुधात असतात. परंतु अनेक वेळा दुधाच्या अभावामुळे किंवा कोणत्याही वैद्यकीय समस्येमुळे आई मुलांना दूध पाजू शकत नाही. अनेक महिला बाळाला अंगावरचं दूध पाजणंही पसंद करत नाहीत. पण, ज्या महिलांना याबाबत माहिती असते त्या स्वच्छेने दान करायला पुढाकार घेतात.

आकडेवारीनुसार, मिल्क बँक सुरू झाल्यानंतर 3 ते 4 वर्षांत, 400 लिटर पर्यंत आईचे दूध रुग्णालयाला वार्षिकपणे दान केले जात होते, जे आता वाढून 1200 लिटर झाले आहे, परंतु कोरोनाच्या गेल्या 15 महिन्यांत कालखंडात दुधाच्या दानामध्ये घट झाली होती. डॉ. मणेरकर म्हणाल्या रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्यामुळे दान कमी झाले आहे.

मातांनी घरातून दान केले -

डॉ. स्वाती मणेरकर यांनी सांगितले की बहुतेक बँकाना रुग्णालयातून दूध प्राप्त होते. अनेक माता प्रसूतीनंतर दुधाचे दान करतात, पण आता मातांनीही घरूनच दूध दान करण्यास सुरुवात केली आहे. घरुन दूध दान करण्यासाठीचे दर महिन्याला एक ते दोन फोन येतात. यानंतर रुग्णालयाचे कर्मचारी गाडी घेऊन त्यांच्या घरी पोहोचून त्यांची संमती घेऊन अगदी सुरक्षितपणे ते दूध मिल्क बँकमध्ये आणतात.

जागरूकतेची आवश्यकता -

ह्यूमन मिल्क बँकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे, पण तरीही ती अजून वाढली पाहिजे. आपल्या बाळाला दूध पाजल्यानंतर दुसर्‍या बाळासाठी दान करता आला पाहिजे. जेणेकरून योग्य तो साठा करता येईल. सध्याच्या गरजेनुसार प्रत्येक एनआयसीयूच्या बाजूला एक ह्यूमन मिल्क बँक असावी.

दात्याची चाचणी करुनच दूध दान -

बँकेत येणाऱ्या दुधाची केवळ चाचणी केली जात नाही, तर दात्याची तपासणीही केली जाते. हेपेटायटीस, एच आय व्ही आणि विडीआरएल या चाचण्या केल्या जातात.

दान केलेले दूध रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्जुंतकीकरण केले जाते, जेणेकरून बॅक्टेरिया मागे राहणार नाहीत. यानंतर ते रुग्णालयाच्या मिल्क बँकेत साठवले जाते आणि गरजू बाळांना दिले जाते.

चार वर्षांत झालेले दूध दान

वर्ष       दाता            दूध दान

2018   7700     1000 लिटर

2019   7300      880 लिटर

2020     6600       526 लिटर

2021 जून 3500     355 लिटर

समुपदेशनाची वाढती गरज -

ओपीडी साठी येणाऱ्या माता, डिस्चार्ज घेऊन घरी जाण्यापूर्वी आधी आणि ज्या मातेचे बाळ एन आय सीयूमध्ये आहे. या मातांना समुपदेशन करुन दूध दान करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते.  दरवर्षी एनआयसीयूमध्ये अडीच ते 3 हजार वर्षाला नवजात बाळ दाखल होतात. त्यामुळे मागणी वाढते आहे पण,त्या प्रमाणात साठा आणि पुरवठा होत नाही. यासाठी स्तनपान करणाऱ्या मातांनी दुध दान करुन स्वतःच्या आणि इतर बाळांना चांगले आयुष्य दिले पाहिजे. 02224063154 या क्रमांकावर संपर्क साधून त्या दान करण्यासाठी येऊ शकतात, असेही डॉ. मणेरकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT