Tourism
Tourism 
मुंबई

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन अत्यवस्थ; पर्यटकांच्या संख्येत 80 टक्क्यांची घट? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये 22 टक्क्यांनी घट झाली. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 60 ते 80 टक्के घटण्याची शक्यता आहे. हे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असेल, असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने (वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन) व्यक्त केला आहे. 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत 22 टक्के घट झाली. मार्चच्या अखेरीस जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्यात आल्या. प्रवास करण्यावर मर्यादा आल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 6 कोटी 70 लाखांनी कमी झाली. परिणामी या क्षेत्राला 80 अब्ज डॉलरचा फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संघटनेने वर्तवली आहे. 

युरोपीय देशांच्या तुलनेत आशियातील पर्यटन क्षेत्राचे जास्त नुकसान झाले आहे. जगात अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या असून, पर्यटन क्षेत्र कोलमडले आहे, असे जागतिक पर्यटन संघटनेचे सचिव झुरब पोलोलिकाश्विली यांनी म्हटले आहे. कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आणखी काही महिने कायम राहिल्यास या वर्षी पर्यटन क्षेत्राचे 58 ते 78 टक्के नुकसान होऊ शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

12 कोटी नोकऱ्यांवर गदा
आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रवासावरील निर्बंध जुलैमध्ये शिथिल झाल्यास पर्यटकांमध्ये 58 टक्के घट होईल. निर्बंध सप्टेंबरमध्ये शिथिल झाल्यास हे प्रमाण 70 टक्के आणि डिसेंबरमध्ये शिथिल झाल्यास 78 टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये 85 कोटी ते 110 कोटी एवढी घट होईल आणि 910 अब्ज ते 1200 अब्ज डॉलर महसूल बुडेल, असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. त्याहून गंभीर परिणाम म्हणजे पर्यटन क्षेत्रातील 10 ते 12 कोटी नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. 

पुढील वर्षाची प्रतीक्षा
जागतिक पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी 2021 ची प्रतीक्षा करावी लागेल. या प्रक्रियेची सुरुवात 2020 च्या शेवटी होऊ शकते, असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यावेळी पर्यटक आरामदायी, धाडसी पर्यटनाऐवजी कामानिमित्त व कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रवास करतील, असे त्यांनी म्हटले आहे. आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांमधील पर्यटन जलद गतीने पूर्ववत होऊ शकते. अमेरिका, युरोप आणि आशियात मात्र त्यासाठी वेळ लागू शकतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT