मुंबई

Corona Case Study : घराचं भाडं, राशन, रिक्षाचा हफ्ता कसा भरायचा? रिक्षाचालकांवर शंभर प्रश्नांचा डोंगर

सकाळवृत्तसेवा

घाटकोपर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम परिणाम झालेला पाहायला मिळतोय. कोरोना माहामारीला लगाम घालण्यासाठी देशात 21 दिवस लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. या संचारबंदीचा श्रीमंतापासून गरिबांपर्यंत फटका बस्तान पाहायला मिळतोय. अशात हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांवर झालेला दिसतो आहे . घाटकोपरच्या जगदुशा नगर येथील रिक्षाचालक अशोक मारुती पाटील ( 37) हे गेली 15 वर्ष मुंबईत रिक्षाचालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . सकाळी आणि सांयकाळी असे शेअर रिक्षा चालवून दिवसा 500 ते 700 म्हणजे महिना 15 ते 20 हजार रुपये कमाई करतात.

भाड्याच्या घरात राहत असल्याने घराचे 5 हजार भाडे, रिक्षाचा 5 हजार हप्ता, मुलांच्या शाळेची क्लासची फी, रिक्षाचा महिन्याचा मेंटेनन्स,  गाडीचा गॅस, ऑईल, इन्शुरन्स हे सर्व खर्च रिक्षाच्या मिळालेल्या कमाईतून अशोक पाटील महिन्याच्या महिन्याला भागवत असतात. 

आता 22 मार्च पासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा बंद आहे. अशात घरात एकही  पैसा येत नसल्याने नसल्याने उर्वरित 14 दिवस रेटायचे कसे असा प्रश्न त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पडला आहे. खिशात पैसे नसल्याने अशोक पाटील यांना मित्र व नातेवाईकाकडून पैसे उसने घ्यावे लागत आहेत.

घराचे भाडे, रिक्षाचा  हप्ता आता उसने घेत राहिले तर कर्ज वाढण्याच्या भीतीने पाटील हे मानसिक रित्या खचून गेले आहेत. पत्नी आणि दोन लहान मुलासह संसार करणारे पाटील हे घरात एकटेच कमावते आहे. त्यामुळे सरकारने रिक्षाचालकांच्या व्यथा समजून घेत त्यांना सहकार्य करण्याची त्यांनी मागणी केली आहे. 

सध्या कोरोनाच्या धास्तीने 21 दिवसांचा लॉकडाऊन पुढे देखील वाढवण्यात आला तर मध्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती ही रिक्षाचालक अशोक पाटील व्यक्त केलीये. 

Corona Case Study mumbai auto rickshaw drivers are facing immense problem due to covid 19 lockdown    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT