मुंबई

कोरोनाने कृषी पर्यटन देशोधडीला 

गिरीश त्रिवेदी

बदलापूर : "निसर्गाने झोडपले आणि राजाने मारले तर बळीराजाने न्याय कोणाकडे मागायचा? अशी अवस्था अंबरनाथ तालुक्‍यातील कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्यांची झाली आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन सुरू केल्याने दोन पैसे गाठीला येतात. मात्र यंदा 26 जुलै आणि 4 ऑगस्ट 2019 रोजी आलेला महापूर आणि त्यातून सावरत नाही तोच कोरोनारुपी आलेल्या संकटामुळे या उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतकी वर्ष मेहनत करून, जीवापाड जपून वृक्ष संपदा वाढवल्याने पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकामागोमाग येणाऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. 

12 महिने वाहणाऱ्या उल्हास आणि बारवी नदीकाठी असंख्य शेतकरी शेती करतात. तर काही शेतकरी हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन करीत आहेत. कृषी पर्यटनामुळे असंख्य बेरोजगार कुटुंबांना रोजगार मिळत आहे. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे ज्या प्रमाणे उद्योग व्यवसायांना फटका बसला तसाच तो शेतीपूरक उद्योगांनाही बसला आहे.

त्यात कृषी पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. उल्हास आणि बारवी नदीकिनारी असलेल्या अनेक कृषी पर्यटन केंद्रांमध्ये वर्षभर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी विविध ठिकाणांहून नागरिक हमखास येत असतात. 

अंबरनाथ तालुक्‍यातील वांगणीजवळील काराव गावातील देशमुख बंधूंच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये तर वर्षभर हजारो पर्यटक येत असतात. यंदा या परिसरात अक्षरश: शुकशुकाट आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात वर्षा सहलींसाठी कुणी आलेच नाही.

त्यामुळे तो सीझन तर वाया गेलाच शिवाय महापुरामुळे कृषी पर्यटन केंद्राची पूरती वाताहत झाली. आता शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या की कृषी पर्यटनातून चार पैसे सुटतील, अशी आशा बाळगून होतो. मात्र कोरोना संचारबंदीमुळे ही संधीही वाया गेल्याचे दिलीप देशमुख यांनी सांगितले. 

कामगारांचाही सांभाळ... 
कृषी पर्यटन केंद्र चालवण्यासाठी बहुतेकांनी महिना आठ, दहा हजार रुपये वेतनावर माणसे कामाला ठेवली आहेत. संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प असला तरी या कामगारांना त्यांना सांभाळावे लागते. शिवाय पर्यटन केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामेही नियमित करावी लागतात. यात कामावर ठेवलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा सांभाळ सुद्धा हे शेतकरीच करीत असतात. इतक्‍या वर्षांपासून कामगारांशी कौटुंबीक नाते तयार झाले असते. त्यामुळे उत्पन्न असो किंवा नसो शेतकरी त्यांना सोडत नसल्याचे चित्र या भागात पहायला मिळते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT