मुंबई

कैद्यांनी तुरुंगात राहिलेलेच योग्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे बाहेरची परिस्थिती अत्यंत भीतीदायक झाली आहे. त्यामुळे कैद्यांनी तुरुंगात राहिलेलेच योग्य आहे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

हे वाचा : याला म्हणतात मदत...

हत्येचा आरोप असलेल्या आरोपी जितेंद्र मिश्राने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मागील 18 महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात आहे. याबाबत न्या. गौतम पटेल यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे उदाहरण न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले. मुंबईतील आजच्या परिस्थितीबाबतही न्या. पटेल यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतील अनेक भाग एकापाठोपाठ एक सील केले जात आहेत. 
कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रशासन कारवाई करत आहे. अशा वेळी एका व्यक्तीला बाहेर सोडून कोरोनाबाबत अनेकांना धोक्‍यात घालणे बरोबर नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

अन्य एका प्रकरणात सोलापूरमधील आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे; मात्र सध्या पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यांना लहान-मोठ्या गुन्हेगारांकडे पाहायला वेळ नाही. ते सध्या कोरोनाशी लढत आहेत, असेही न्यायालयाने सुनावले. सध्या देशातील कारागृहात असलेल्या आरोपींना सोडले जात आहे, तुम्हाला लॉकडाऊनमध्ये अटक झाली तर नेणार कुठे आणि ठेवणार कुठे, असेही न्या. पटेल यांनी मिश्‍कीलपणे विचारले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT