Uday Samant sakal media
मुंबई

राज्यातील महाविद्यालये सप्टेंबरमध्ये होणार सुरु?; उच्च शिक्षण मंत्र्यांचे संकेत

संजीव भागवत

मुंबई : कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे (corona infection) मागील वर्षभरापासून बंद असलेली व उच्च शिक्षण देणारी सर्व महाविद्यालये (colleges) 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत सुरू (college starts) केली जाणार असून त्यासाठीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज मुंबईत (mumbai) माध्यमांशी (media) बोलताना दिली. (corona infection-Mumbai-media-college starts)-nss91)

राज्यात पारंपारिक विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी सर्व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या कक्षेत येणार्‍या कार्यक्षेत्राचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याचा विचार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात असलेल्या कुलगुरुंना संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर नियोजन ही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील विद्यापीठांकडून पुढील आढावा 15 दिवसात प्राप्त होईल, त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयही 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबपर्यंत प्रत्यक्षात सुरू करण्याचा आम्ही विचार करत असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT