मुंबई

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात! 13 दिवसांत 105 दिवसांनी रुग्ण दुपटीत वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई  :दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा एकदा झाल्याने मुंबई हाय अलर्टवर होती. त्यातच रुग्ण दुपटीच्या कालावधीत झपाट्याने होणारी घसरण यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. मात्र आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला असून रुग्ण दुपटीच्या कालावधीत 13 दिवसांत 105 दिवसांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह मुंबईकरांची चिंता कमी होत आहे.

दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढ होऊ लागली आहे. 

1 नोव्हेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत 213 दिवसांवर पोहोचला होता. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.33 टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिका यश आले आहे. 13 दिवसांत तब्बल 105 दिवसांची रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ झाल्याने कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

तारीख रुग्ण दुपटीचा कालावधी रुग्ण वाढीचा सरासरी दर
1 डिसेंबर 213 0.33 टक्के
5 डिसेंबर 257 0.27 टक्के
10 डिसेंबर 302 0.23 टक्के
13 डिसेंबर 318 0.22 टक्के

Corona infection under control in Mumbai! Patients doubled in 105 days at 13 days

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT