मुंबई

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढतोय? एकूण रुग्णांचा आकडा तीन लाखांच्या जवळ

मिलिंद तांबे

मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकंवर काढलेलं दिसत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पुन्हा शहरात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. रविवारी 1,135 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,75,707 झाली आहे.   काल 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,673 वर पोहोचला आहे. रविवारी 618 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,52,127 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 258 दिवसांवर गेला आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत एकूण 17,73,989 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.27 इतका आहे.

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 19 मृत्यूंपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. रविवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 12 पुरुष तर 7  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 3 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 14 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते.

मुंबईत 365 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4,168 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5,669 अति जोखमीचे व्यक्ती आले त. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून रविवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 436 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

राज्यात 5,753 नवे रुग्ण

रविवारी राज्यात 5,753 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 17,80,208 इतकी झाली आहे. काल राज्यात 50 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.62 इतका झाला आहे. राज्यात रविवारी एकूण 81,512 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात काल दिवसभरात 4,060 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 16,51,064 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. रूग्ण बरे होण्याचा दर 92.75 टक्के इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona infestation rise again in Mumbai total number of patients is close to three lakh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT