mental hospital
mental hospital 
मुंबई

ठाणे मनोरुग्णालयात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, 'इतक्या' महिला रुग्ण बाधित

राहुल क्षीरसागर

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सात महिला रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या सर्व बाधितांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाने यापूर्वीच शिरकाव केला असून एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. त्या वेळी रुग्णालयातील या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 38 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला होता.

मात्र काही दिवसांपासून मनोरुग्णालयातील काही महिला रुग्णांना हलका ताप येत असल्याने खबरदारी म्हणून त्यांची ऍन्टिजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून सात महिला रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

(संपादन : वैभव गाटे)

corona infestation at thane mental hospital once again infecting female patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT