Congress sakal media
मुंबई

कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) कमी झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका (KDMC Elections) लवकरच घोषित केल्या जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा काँग्रेस (Congress) कार्यकर्ते देत आहेत. त्या दृष्टीने शनिवार (ता. ११) पासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे (Sachin Pote) यांनी ‘काँग्रेस आपल्या दारी’ हे अभियान (political campaign) सुरू केले आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवरील निवडणूक स्वबळावर लढाव्यात, अशा सूचना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याचे संकेत देत संघटना बांधणीस सचिने पोटे यांनी सुरुवात केली आहे.

काँग्रेस आपल्या दारी या अभियानाअंतर्गत प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिवाय नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Election Prakash Abitkar : गोकुळ निवडणुकीतील पराभवाचे प्रकाश आबिटकरांनी महायुतीवर खापर फोडलं, अतिआत्मविश्वास नडल्याची दिली कबुली

Hardik Pandya : हार्दिक पांड्याचे 'दर्शन' आता थेट IPL 2027 मध्ये होणार! न्यूझीलंडपाठोपाठ श्रीलंका, झिम्बाब्वे मालिकेलाही मुकणार...

Gold Rate Today: सोन्याचे भाव घसरले, तरी दसऱ्याच्या मूहर्तावर खरेदी कमी! कारण काय? 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Water Shortage: शेतीला नाही, आता फक्त प्यायला पाणी;कन्नड तालुक्यातील लघु, मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा खालावल्याने निर्णय

VIRAL VIDEO : आई वडील समुद्रकिनाऱ्यावर रील बनवण्यात व्यस्त, मूल लाटांत गंटागळ्या खाऊ लागलं अन्... चीड आणणारा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT