

Gokul Milk Election Prakash Abitkar kolhapur
esakal
Prakash Abitkar Statement : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवत महायुतीला धक्का दिला. या निकालानंतर महायुतीच्या पराभवाची कारणे समोर येऊ लागली असून, राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “महायुतीमध्ये थोडासा आत्मविश्वास, किंबहुना अति आत्मविश्वास नडला,” अशी कबुली आबिटकर यांनी दिली.