मुंबई : मुंबईत आज 1,132 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,31,542 झाली आहे. मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,265 वर पोचला आहे. मुंबईत आज 864 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे.
मुंबईत आज नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 39 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 46 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 32 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 864 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,06,057 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 89 दिवसांवर गेला आहे. तर 18 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,71,888 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.78 इतका आहे.
मुंबईत 575 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,493 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,759 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,306 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.