dharavi 
मुंबई

दिलासादायक बातमी! धारावीत कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात; दादर-माहीममध्येही रुग्णवाढ आटोक्यात..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईतल्या दाट लोकवस्तीत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा नियंत्रणात आला आहे. 

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ 13 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 1912 वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून नवीन रुग्णसंख्या घटली आहे.  

आज धारावीत 14 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 1912 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 71 वरच रोखण्यात यश आले आहे. माहीम मध्ये आज 13 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 637 इतकी झाली आहे.

तर मृतांचा आकडा 9 इतका आहे. तर दादर मध्ये आज 24 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही 408 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 12 मृत्यू झाले आहेत. 

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात 50  नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 2957 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 90 इतका आहे.

corona patients decreased in dharavi and dadar read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT